। नेरळ । प्रतिनिधी ।
तालुक्यात नेत्रदानाची चळवळ चालविणार्या दृष्टी मित्र यांच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात कर्जत तालुक्यातील 16 नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. दृष्टी मित्र, लक्ष्मी नेत्र पेढी पनवेल आणि विजय हरिश्चंद्रे यांची संकल्पना तसेच श्री छत्रपती शिवाजी मंडळ व लक्ष्मी नेत्रपेढी आयोजित नेत्रदान संकल्प पत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कर्जत शहरातील पाटील आळी येथील श्री हनुमान मंदिरमधील मंजुला वसंत जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड भूषण विजय मांडे तर दत्ता म्हसे,विजय हरीश्चंद्रे, डॉ.निकेत गांधी, डॉ. अलका जाधव आदी उपस्थित होते.