। नेरळ । प्रतिनिधी ।
गौरकामत येथे रायगड हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. गौरकामत ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात तब्बल 173 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 46 रुग्णांवर विविध प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना रायगड हॉस्पिटल मध्ये दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येतील अशी माहिती आरोग्य विभाग प्रमुख महेश काशीद यांनी दिली आहे.
रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वैद्यकीय आणि आरोग्य पथकाने रुगणांची तपासणी केली. त्याआधी ग्रामपंचायतीचे सरपंच आशा पवार आणि उपसरपंच योगेश देशमुख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जिन्या भोईर, प्रवीण देशमुख, वेदिका रोकडे, अनन्या पिंगळे, रमेश पवार, अनिता वाघमारे, शरद वाघमारे आणि ग्रामविकास अधिकारी पी.जी. गाडेकर हे उपस्थित होते. शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी डॉ. वसंत सावंत, डॉ. अमरीशसिंह कांबळे, डॉ. द्वमदीप गणवीर, डॉ. अभिलाषा रामचंद्रन, डॉ. नम्रता कदम, डॉ. राजीव ब्राम्हणे या तज्ञ डॉक्टरांकडून तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. अलिशा हरपुडे, डॉ. अरमान शेख, डॉ. अपूर्वा मळगे, डॉ. विद्या कन्हेरे, विद्यार्थी तसेच नर्सिंग स्टाफ आणि फार्मसी यांनी सहकार्य केले.