| रत्नागिरी | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांवरील अत्याचार, विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्याला मारहाण इतकेच नव्हे, तर खुनासारख्या घटना राज्यात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून आता राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांची सुरक्षा जपण्यासाठी शाळांमध्ये उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशनही केले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेल्या अत्याचार, मारहाण, खून, यासारख्या घटनानंतर सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपाययोजनेबाबत सूचना केल्या होत्या. यामध्ये समुपदेशानवरही भर देण्यात आला आहे. शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. शाळेच्या शिक्षकांना समुपदेशन प्रक्रिया नियमित राबविली जात आहे. अनुदानित शाळांमधून तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जात आहे. यासाठी शिक्षकांना परीक्षा मंडळाकडून खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. समुपदेशनाद्वारे विद्यार्थ्यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक विकासासाठी समुपदेशन गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी समुपदेशनावर भर
