विद्युत वितरण कर्मचार्‍यांचा सत्कार

। पनवेल । वार्ताहर ।

शिवसेना पनवेल तालुक्याच्या वतीने कळंबोली शहर व पनवेल येथील विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुकाप्रमुख व आयोजक विश्‍वास पेटकर, युवासेनेचे जिल्हाधिकारी पराग मोहिते, प्रमोद पाटील विभागप्रमुख, अरविंद कडव शहरसंघटक कळंबोली, कुष्णकांत कदम उपशहर प्रमुख, राजेश केणी विभागप्रमुख, महेश गुरव विभाग प्रमुख, कपिल जमदाडे विभाग प्रमुख, विवेक गडकरी शहर संघटक, तुषार निढालकर उपविभाग प्रमुख, जमील खान माथाडी ट्रांसपोर्टसेना अध्यक्ष, जीवन पाटील विधानसभा विभागचिटणीस युवासेना, गौरव गव्हाणे युवासेना अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version