जे.एस.एसच्या माध्यमातून युवकांना रोजगार

| रसायनी | वार्ताहर |

कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्‍वकर्मा योजनेची अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे ”प्रधानमंत्री विश्‍वकर्मा” योजनेतील जिल्यातील पहिले सेंटर अलिबाग येथे सुरू करण्यात आले व टेलर व पार्लर या पहिल्या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन गुरुवारी( दि.28) संपन्न झाले.

सदर योजनेत देशातील 1000 पेक्षाही अधिक प्रधानमंत्री विश्‍वकर्मा सेंटरच्या माध्यमातून लाखो विश्‍वकार्माना 2028 पर्यंत मोफत व्यवसायाभिमुख कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सहा दिवसांच्या प्रशिक्षण वर्गांमध्ये प्रति विद्यार्थी एकत्रित प्रोत्साहन भत्ता चार हजार रुपयांबरोबरच, मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र, प्रत्येकी 15 हजार रुपयांचे विश्‍वकर्मा किट अथवा व्हाउचर्स बरोबरच कौशल्य वृद्धी प्रशिक्षणासह 5% व्याजदराने तीन लाख रुपयापर्यंतची टप्या टप्याने कर्ज सुविधा देखील प्रशिक्षाणार्थ्याना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती कार्यक्रमाच्या प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगड चे संचालक डॉ. विजय कोकणे यांनी व्यक्त केले. जे.एस.एस रायगडच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्‍वकर्मा योजना हजारो युवकांना रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सदर योजनेचा फायदा घेऊन नाव नोंदणी करावी असे उद्गार कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैय्या व अध्यक्ष डॉ. नितीन गांधी यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी रत्नप्रभा बेल्हेकर, विजय कुलकर्णी, कपिदास माने, सुनिता चान्दोरीकर, अ‍ॅड. नीला तुळपुळे, दत्तात्रेय नाईक, गीतांजली ओंक, नरेन जाधव, पल्लवी तुळपुळे , प्रतिक्षा सचिन चव्हाण, रुपाली माळवी, वृषाली भागवत, रिद्धी पाटील, कल्पना म्हात्रे, वेदांती पाटील, रुपाली माळवी, वृषाली भागवत, रिद्धी पाटील व प्रतीक्षा चव्हाण यांच्या उपस्थितीत होते.

Exit mobile version