बालकांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करा

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

बाल विकास प्रकल्प रत्नागिरी सिंधुदुर्ग नागरी प्रकल्पातर्फे शुन्य ते तीन वयोगटातील मुलांसाठी व पालकांसाठी पालक मेळावा आयोजित करण्यात आला. बालकाचा सर्वांगीण विकास विशेषतः भावनिक विकास उत्तम रीतीने घडून येण्यासाठी पालकांनी घरी आणि अंगणवाडीमध्ये बालकांना खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन साधना पागी यांनी केले.

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक, भावनिक, शारीरिक विकासासाठी मेळाव्यामध्ये खेळ कृती प्रदर्शन लावण्यात आले होते. बाल संगोपनाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पालक मेळावा घेण्यात आला. गृहभेट व पालक सभेच्या माध्यमातून आपण थेट निगा राखणारी व्यक्ती पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांपर्यंत पोहोचू शकतो, तर पालक मेळाव्याद्वारे आपण समुदायातील प्रत्येक घटकापर्यंत बाल विकासाचे महत्त्व आणि संदेश पोहोचवू शकतो, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

Exit mobile version