म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा बौद्धवाडी येथिल कोव्हिड 19 मुळे एक पालक गमावलेल्या पाल्यांना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय रायगड व एस ओ एस चिल्ड्रन सोगाव या संस्थेच्या वतीने कोरडे धान्य वाटप करण्यात आले. तसेच वारळ येथील कै. दयानंद लक्षुमन कविलकर व कै. सुमिता दयानंद कविलकर यांची तीन मुले समीक्षा, दिक्षा आणि मनीष यांचे पालक गमावलेल्या बालकांना मोफत अन्य धान्य वाटप करण्यात आले.
पालक गमावलेल्या 3 बालकांना एस. ओ. एस. या संस्थेने संगोपन व शिक्षणासाठी वयाच्या 18 व्या वर्षा पर्यंत स्वावलंबी होईपर्यंत सदर 3 बालकांना अलिबाग संस्थेमध्ये पाठविण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी पं.स म्हसळा वाय. एम. प्रभे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व्यंकट बी तरवडे, विस्तार अधिकारी सांख्यिकी प्रमोद. एम. गायकवाड विस्तार अधिकारी शिक्षण संतोष आर. शेडगे, जिल्हा बाल संरक्षण कक्षेतील अजिनाथ काळे, समुपदेशक, व एस. ओ. एस. बालग्राम, सोगाव,अलिबाग अमित नागरे, वरिष्ठ शिक्षण सहाय्यक संजय कचरे, वरिष्ठ शिक्षण सहाय्यक , मनिषा देसाई, वरिष्ठ शिक्षण सहाय्यक , पर्यवेक्षिका वैष्णवी आर.कळंबास्कर , कनिष्ठ सहाय्यक अरविंद डी. बैनवाड, गटसमन्वयक कल्पेश के पालांडे, अंगणवाडी सेविका मनस्वी एम. जाधव हे उपस्थित होते.