| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
कळंबोली वसाहतीमधील प्रभाग क्रमांक ‘ब’ मधील रस्त्यावर अनधिकृतपणे हातगाड्या लावून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी जवळपास 5 हातगाड्या जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कळंबोली वसाहतीमध्ये जागा मिळेल त्या ठिकाणी पदपथावर अनधिकृतपणे हातगाड्या लावून व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिका विरोधात पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमण विभागाच्या कारवाई नंतर देखील बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे व्यवसायिक हातगाड्या लावून पादचारी आणि वाहणाचलकांचा रस्ता अडवत आहेत. ही बाब लक्षात आल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पाथकाकडून मंगळवारी (दि.10) करण्यात आलेल्या कारवाईत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवल्यांकडून 5 हातगाड्या ताब्यात घेत त्यांच्यावर तोडक कारवाई करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ‘ब’च्या अधीक्षकपदी मनोज चव्हाण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आल्यानंतर अतिक्रमण विभागाकडून करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.