। सिडनी । वृत्तसंस्था ।
इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलियाला 3-1 अशा फरकाने नमवत महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर स्पेनचे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाची तारांकित खेळाडू सॅम करने स्पर्धेत प्रथमच सुरुवातीच्या अकरा खेळाडूंमध्ये सहभागी होती. तिने ऑस्ट्रेलियन संघासाठी एकमेव गोलही केला. मात्र, युरोपिय विजेता इंग्लंडला नमवण्यासाठी हा गोल पुरेसा नव्हता. सामन्याच्या पहिल्या सत्रात इंग्लंडचे पूर्णपणे वर्चस्व राहिले. इंग्लंडच्या एला टूनने (36व्या मिनिटाला) ऑस्ट्रेलियाच्या बचावफळीला भेदत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बरोबरी साधण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचे प्रयत्न सुरू झाले. पण, इंग्लंडच्या बचावपटूंनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे मध्यांतरापर्यंत संघाकडे 1-0 अशी आघाडी होती.
दुसर्या सत्रात ऑस्ट्रेलियन संघाने आक्रमक सुरुवात केली आणि त्याचा फायदाही संघाला झाला. करने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
या गोलनंतर स्टेडियममध्ये उपस्थित ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, त्यांना या गोलचा आनंद फार काळ घेता आला नाही. इंग्लंडच्या लॉरेन हेम्पने ऑस्ट्रेलियाच्या गोलरक्षकाला चकवत गोल केला व इंग्लंडला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर अॅलेसिया रूसोने गोल झळकावत संघाला 3-1 असे मजबूत स्थितीत पोहोचवले. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले. पण, इंग्लंडच्या बचावपटूंनी त्यांना कोणतीच संधी दिली नाही आणि अखेपर्यंत आघाडी कायम राखताना विजय नोंदवला. स्पेन व इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना रविवारी पार पडेल.भारताचा पुरुषांचा संघ पात्रता फेरीत चौथ्या स्थानावर राहिला. त्यानंतर पहिल्या फेरीत इटलीशी दोन हात करावे लागले. भारतीय संघाने इटलीवर 239-235 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाने मेक्सिकोवरही मात करीत उपांत्य फेरीत पाऊल ठेवले.