पनवेल मनपा हद्दीत इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रीतम म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेमार्फत मनपा हद्दीत विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा ठराव पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे पालिका हद्दीत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे.

पनवेल महानगरपालिकेमार्फत सद्यःस्थितीत 11 शाळा चालविण्यात येत आहेत. यापैकी 8 मराठी माध्यमाच्या शाळा, 2 उर्दू व 1 गुजराती शाळा आहेत. मात्र, अद्याप पनवेल महानगरपालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा नाही. मनपाच्या सद्यःस्थितीत इ.1 ते इ.7 पर्यंतच्या शाळा आहेत. पालिका हद्दीत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली होती. इंग्रजी माध्यमाची होणारी शाळा पूर्व प्राथमिक ते इ.10 पर्यंतच्या वर्गासाठी सुरू केली जाणार आहे.

Exit mobile version