देगाव शाळेत महिलांसाठी उद्बोधन वर्ग

| माणगाव | प्रतिनिधी |

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या अभियानास सुरुवात झाली. गुरूवार, दि.25 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता समिक्षा संदीप साळवी, गोरेगांव यांनी महिलांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन केले.

यावेळी देगाव शाळेतील माजी विद्यार्थी सध्या शारजा येथे नोकरीनिमित्त असलेले एक दानशूर व्यक्तिमत्त्व निलेश गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना टाय व बेल्ट दिले. त्यांचे वाटप निलेश गायकवाड यांचे वडील दिलीप गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्व. सुलोचना तुकाराम गायकवाड यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव राजेश तुकाराम गायकवाड यांनी शाळेसाठी पंखा भेट दिला. तसेच माजी विद्यार्थी राज जयराम महाडिक यांनी शाळेसाठी दिलेला पंखा त्याची आई संगिता जयराम महाडिक यांच्या हस्ते स्वीकारण्यात आला.

या कार्यक्रमासाठी दिलीप गायकवाड, काशिनाथ गायकवाड, मनोज गायकवाड, राजेश गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, भालचंद्र गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैष्णवी मर्चंडे, शेजल कदम, ज्योती महाडिक, प्रणाली गायकवाड, अंगणवाडी ताई तेजश्री गायकवाड, स्वयंपाकी समिक्षा दिवेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला मोरे, पदवीधर शिक्षक शंकर शिंदे, शिक्षिका प्रतिक्षा अंबुर्ले तसेच महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version