| म्हसळा । वार्ताहर ।
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अभियानास सुरुवात झाली आहे. सोमवार दि. 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता उपकेंद्र खरसई येथील डॉ. चारूशिला गायकवाड यांनी किशोरवयीन मुलींसाठी व महिलांसाठी विविध समस्यावर मार्गदर्शन केले. यामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या बालकांना मधुमेह डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी डॉ. गायकवाड यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. सोबत आरोग्य सेविका प्रविणा डंगारे यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता बाबत माहिती दिली. सोबत आशा सेविका श्रध्दा कांबळे उपस्थित होत्या. यावेळी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व महिला वर्ग व सदस्य आवर्जून उपस्थित होते. त्याचबरोबर गावातील किशोरवयीन मुली, माजी विद्यार्थी युवती उपस्थित होत्या.