| खांब | वार्ताहर |
श्री. विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा येथे संपन्न झालेल्या समस्या परिहार स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि केपीआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छोटे सायंटीस्ट्स’ हा विज्ञानाचा प्रकल्प गेली अनेक वर्षे महाराष्ट्र तसेच, अन्य राज्यांमध्ये सुरु आहे. रोहा, रायगडमध्ये एक्सेल कंपनीची संस्था व्हिआरटीआय आणि अंशुल कंपनी यांच्या संयुक्त छोटे सायंटीस्टस हा उपक्रम रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी व्हिआरटीआय संस्थेमध्ये समस्या परिहार स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत तालुक्यातील ग्रामीण 14 माध्यमिक शाळांनी यामध्ये सहभाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढविली.
यावेळी एक्सेल कंपनीचे सेक्रेटरी सुरेंद्र सिंगवी, डॉ. टिना तसेच, अंशुल कंपनीचे एचआर मॅनेजर किशोर तावडे, व्हिआरटीआय रोहाचे सुशील रुळेकर उपस्थित होते. स्पर्धा संयोजक म्हणून हर्षदा दगडे, प्रसाद भोईर, तेजल नवशे व संपदा शिर्के यांनी ज्ञान प्रबोधिनीचे ओंकार बाणाईत यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन हेमा विसावे शेजवळ यांनी केले, तसेच परीक्षक म्हणून अनुज भारद्वाज, दिपिका दिक्षित-तांबेकर यांनी काम पाहिले.







