रोजगार मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद

| रसायनी | वार्ताहर |

तुराडे ग्रुप ग्रामपंचायत व लायन्स क्लब ऑफ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.27) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण 105 युवकांनी हजर राहून मुलाखती दिल्या तर 120 युवकांनी ऑनलाईंन नावनोंदणी केली.

परिसरातील युवकांना रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यात आल्याने अनेकांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक केले. यावेळी बारा कंपन्याचे अधिकारी उपस्थित होते. अनेक तरुण-तरुणींनी मुलाखती दिल्याने त्यांना कंपनीत मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रितम म्हात्रे म्हणाले की, समाजात बरेच तरुण बेरोजगार आहेत, अशा वेळी ग्रामपंचायतीच्यावतीने आणि लायन्स क्लब ऑफ पनवेल चव्हाण साहेब, अशोक गिलडा, उपसरपंच आणि सदस्य यांनी रोजगार मेळा लावून एक चांगलं सामाजिक काम केल्याचे सांगितले.

यावेळी सरपंच रंजना गायकवाड, रिया माळी, मनोहर भोईर, काशिनाथ पाटील, प्रितम म्हात्रे, सुरेश ठाकूर, गजानन माळी, जगदीश पवार, सचिन मते, मयुर ठाकूर, संतोष वाघमारे, प्रदिप माळी, विलास पाटील ,विश्वनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

Exit mobile version