सर्वे शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

| अलिबाग | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वे शाळेत शनिवार, दि.15 जून रोजी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे गुलाब पुष्प देऊन व शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करून स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले, तसेच संतोष मोरे मित्रमंडळ यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय कांगणे, उपाध्यक्ष शैलेश जाधव, संतोष मोरे, सरोज दिवेकर, सदस्य नरेश धार्वे, सुशील खोपकर, संतोष सावंत, दीपिका येलकर,जयंता धार्वे, दिपक येलकर, योगेश घोगले, संतोष मित्र मंडळाचे सर्व स्वयंसेवक, अंगणवाडी कर्मचारी, पालक, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, सहशिक्षक सूर्यकांत पाटील उपस्थित होते.

Exit mobile version