जागतिक महिला दिनानिमित्त पर्यटकांसाठी खास सवलत
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील येथील राजपुरी ऐतिहासिक जंजिरा किल्ला, अलिबाग येथील कुलाबा किल्ला व महाड येथील रायगड किल्ल्याचे प्रवेश शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरातत्व विभागातर्फे पर्यटकांकडून आकारले जाणारे प्रवेश शुल्क महिला दिनाचे औचित्य साधून त्याच दिवशी महिलांच्या सन्मानार्थ महिलांसह पुरुषांना, आबालवृद्धांना पूर्णतः माफ असणार आहे, अशी माहिती सहाय्यक संवर्धक पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.
पुरातत्व खात्याने महिला दिनाचे औचित्य साधून पर्यटकांसाठी खास योजना दिल्याने पर्यटकांच्या संख्येत नक्कीच वाढ होणार असून, याचा फायदा येणार्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यात शनिवारी व रविवारची सुट्टी असल्याने या दिवशी जिल्ह्यातील गडकिल्लांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळणार आहे.