रोहा नप आरक्षणात समसमान संधी

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा नप आरक्षण नगरपालिकेच्या द.ग.तटकरे सभागृहात सोमवारी प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले. यावेळी रोहा नप मुख्याधिकारी डॉ धीरज चव्हाण तसेच सर्वपक्षीय पुढारी उपस्थित होते.
जाहीर झालेल्या आरक्षणात द्विसदस्य असणारे 10 प्रभाग असून एकूण 20 नगरसेवक आहेत. नगरपालिकेतील 10 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत तर 10 जागा सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांना आपल्या घरातील महिलांना संधी द्यावी लागणार आहे. अन्यथा सर्वसाधारण गटात लढल्यास विरोधी पक्षाच्या उमेदवारासह कदाचित स्व पक्षातील उमेदवाराचा देखील सामना करायची वेळ येणार असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी इच्छुकांनी आपल्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कही खुशी कही गम असे चित्र आहे.

Exit mobile version