रायगडातील नगरपंचायतींचे आरक्षण सोडत
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षणामुळे महिलांची राजकीय शक्ती वाढत चालली असून, सोमवारी जाहीर झालेल्या रायगडातील माणगाव, तळा, पोलादपूर, पाली, खालापूर आदी नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणात महिलांनी बाजी मारली आहे.आगामी काळात होणार्या नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांनीही उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे.
माणगाव नगरपंचायतीच्या दुसर्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले.त्यानुसार 17 पैकी 9 जागा या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. तळा नगरपंचायतीमध्येही 9 महिलांना संधी मिळणार आहे.काही ठिकाणी बदल झाले असल्याने कही खुशी कही गम अशी स्थिती सर्वपक्षीयांमधे दिसून आली.यामध्ये सर्वसाधारण महिला 5,ओबीसी 2,एसटी 1,एससी 1 असे आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे.
पाली नगरपंचायतीची यंदा पहिलीच निवडणूक होत आहे.तेथेही प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.तेथेही 9 महिलांना प्रथमच नगरसेवक होण्याची संधी मिळणार आहे.त्यामुळे इच्छुक महिलांनी मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे.