| खांब | प्रतिनिधी |
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेली अनेक वर्षे कोलाड विभाग बौद्ध समाज व बहुजन समाज यांच्यावतीने समाज प्रबोधनासह अन्य सामाजिक समस्या व प्रश्न याबाबत नेहमीच मोलाची कामगिरी बजावली आहे. नुकतीच कोलाड विभाग बौद्ध समाज व बहुजन समाज नुतन विभाग कमिटी स्थापन करण्यात आली असून, अध्यक्षपदी प्रविणमोरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सुरेंद्र साळुंके, सचिवपदी नामदेव गायकवाड, सुमीत गायकवाड, खजिनदारपदी कुणाल गायकवाड, तसेच सल्लागार म्हणून सिद्धार्थ गायकवाड, नरेश गायकवाड, सुरेश गायकवाड, अनंत घाडगे, हिरामण मोते, रमेश गायकवाड, बापू भंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेच्या वेळी संतोष कांबळे, चंद्रशेखर कांबळे, निळकंठ घाडगे, विश्वनाथ जाधव, विलास कांबळे, प्रदीप वाघमारे, नरेश गायकवाड, कुणाल गायकवाड, सुमीत गायकवाड, प्रविण गायकवाड, हिरामण मोते, विजय शिंदे, नामदेव गायकवाड, अनिल ओव्हाळ, बापू भंडारी, अनंत घाडगे, सुरेंद्र साळुंके, रमेश गायकवाड, प्रमोद जाधव, सोमनाथ वाघमारे, भास्कर गायकवाड आदी उपस्थित होते.
नूतन विभाग कमिटी स्थापन
