रायगड जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ स्थापन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांची सभा अलिबाग येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ निवृत्त मुख्याध्यापक अ.प्र.देशमुख होते. सभेस निवृत्त मुख्याध्यापक अ.प्र.देशमुख, श्रीकांत पाटील, बी.पी.म्हात्रे, पुरुषोत्तम साठे, सुरेश पाटील, सौ.संजिवनी जोशी, डी.व्ही.पाटील, चंद्रकांत म्हात्रे, चंद्रकांत नवगिरे, एस.एम.ठाकूर, उल्हास ठाकूर, बाळकृष्ण बांदेकर, रमेश पाटील, मीना जोशी, प्रज्ञा जोशी उपस्थित होते. सर्वप्रथम संघटनेचे प्रवर्तक श्रीकांत पाटील यांनी संघटनेची आवश्यकता आणि महत्व विशद केले. यावेळी उपस्थित अनेक मुख्याध्यापकांनी चर्चेत भाग घेतला.

या सभेत चर्चेअंती श्रीकांत पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघाच्या कार्याध्यक्षपदी पनवेल येथील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बी.पी.म्हात्रे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी खांब-रोहा येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष अविनाश म्हात्रे सर व पनवेल येथील पेंशन केस तज्ञ अनुभवी एस.एम.ठाकूर सरांची निवड झाली. सचिवपदी पेण तालुक्यातील सुरेश पाटील तर सहसचिवपदी प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली. खजिनदार हे महत्त्वाचे पद चंद्रकांत नवगिरे यांना देण्यात आले. अतर्गत हिशोब तपासनीस म्हणून बाळकृष्ण भादेकर यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ निवृत्त मुख्याध्यापक ‌अशोक देशमुख यांची नियुक्ती झाली. सांस्कृतिक, आरोग्य व सहल प्रमुख म्हणून अनुक्रमे जगन्नाथ जांभळे, आर.के.पाटील व‌ उल्हस जांभळे यांची निवड झाली.कार्यकारणीमध्ये के.पी.पाटील, चंद्रकांत म्हात्रे, अ.वि.जंगम, व्ही.व्ही.पाटील, भानूदास बोराटे, सौ.ज्योत्सना चौगुले, सौ.संजिवनी जोशी, आर.एन.पाटील, प्रशांत गायकवाड, प्रकाश खरसंबळे व आर.के.म्हात्रे यांची निवड करण्यात आली. शेवटी उपस्थितांचे आभार मानून व सर्वांना शुभेच्छा देऊन सभेची सांगता झाली.

Exit mobile version