तळा तालुका पत्रकार संघाची स्थापना

अध्यक्षपदी कृष्णा भोसले यांची निवड
। तळा । वार्ताहर ।
तळा तालुका पत्रकार संघाची नव्याने स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी कृष्णा भोसले, कार्याध्यक्षपदी संध्या पिंगळे, सचिवपदी श्रीकांत नांदगावकर तर सदस्य म्हणून संतोष जाधव व सुरज पुरारकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सोनसडे येथील कालभैरव सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कृष्णा भोसले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तळा तालुका पत्रकार संघ हा सामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी लढणार असून तालुक्यातील रस्ते,पाणी समस्या, विज समस्या अशा अनेक समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यास कटिबद्ध आहे. तसेच पत्रकारांना भेडसावणारे प्रश्‍न प्रामाणिकपणे सोडविणार असल्याचे आश्‍वासन दिले.

Exit mobile version