पिल्ले कॉलेजमध्ये युफेरीयचा जल्लोष

| रसायनी | प्रतिनिधि |

रसायनी येथील पिल्ले कॉलेजमध्ये 1 फेब्रुवारीपासून सलग तीन दिवस विविध सांस्कृतीक कार्यक्रम युफेरीया सोहळा जल्लोषात साजरा झाला. सिनेअभिनेत्री मयुरी देशमुख यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात स्टेज इव्हेट, नॉन स्टेज इव्हेंट, स्टडअप कामेडी शो, विविध गेम्स, नाईट मेरीड डेचा सेलिब्रेशन झाले. युफेरीयात लग्न कल्लोल या मराठी चित्रपटातील अभिनेत्री मयुरी देशमुख तसेच मराठी सिनेसृष्ठीतील स्कायलंड येथे चित्रीत झालेला मराठी चित्रपट मुसाफीरा या चित्रपटातील अभिनेते पुष्कर जोग व भोजपुरी अभिनेत्री सिन्हा तसेच टाईमपास चित्रपटामधील अभिनेते प्रथमेश परब यांची उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिल्ले कालेजचे विद्यार्थ्यांकडून उत्तम नियोजन करण्यात आलेले. यावेळी लता मेनन, डॉ. निवेदीता श्रेयांश, जगदीश बकाल, डॉ.केतन वीरा, सुचीता सयाजी, अमर मांगे, ममता पाटील, रीमा निकाळजे, आर. बी. पाटील कॉलेजचा सर्व स्टाफ व युफेरीया या टीमचे सर्व सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version