| मुंबई | प्रतिनिधी |
गिरगावात रंगला सदाबहार 7 रिदम ओर्केस्टा केतन खेडेकर गिरगावात साहित्य संघ मंदिर येथे 7 रिदम या सदाबहार ओर्केस्टाचे आयोजन नुकतेच आयोजक मीनल मंगेश लाड यांच्या वतीने करण्यात आले होते. या ओर्केस्टामध्ये रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्तिती लावून या ऑर्केस्ट्राचा मानमूराद आनंद लुटला.
या ऑर्केस्ट्रामध्ये प्रसिद्ध गायक अलोक काटदरे, आनंद आरोळकर, अमर आर्टे, चांग, सर्वेश मिश्रा, किरणकुमार, हरीश भट,दीप्ती पिंपुटकर, सपना सुधीर, गौरी त्रिवेदी,संगीतकार अजय मदनजी आणि पार्श्वगायक दिलराज कौर यांनी आपली गाणी सादर केली. तर विनायक शिंदे यांनी या ओर्केस्टाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमात महाराष्ट्र बाजार पेठचे संचालक कौतिक दांडगे यांनी प्रेक्षकांमधून एक महिला प्रेक्षकाला पैठणी आणि पुरुष प्रेक्षकाला लॉटरी काढून पैठणी आणि सूट लेन दिले.यावेळी शिवसेना नेते पांडुरंग सकपाळ, आ. मंगलप्रभात लोढा, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, बाळा अहिरेकर, मनमोहन माहिमकर, प्रविण मंत्री, नितीन कोलगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आम्ही दरवर्षी रिदमिस्ट कै दत्ता लाड यांच्या स्मृतीनिमित्त 7 रिदम हा सदाबहार गाण्याचा ओर्केस्टा घेत असतो. परंतु कोरोनामुळे हा कार्यक्रम 2 वर्षांनी सादर झाला असून यातून मिळालेले मानधन आम्ही संगीतकार, वादक आणि गायकांसाठी दिले असून या पुढे देखील असाच कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती 7 रिदम ओर्केस्टाचे आयोजक मीनल मंगेश लाड यांनी दिली.