शिक्षणामध्ये परीक्षा महत्वाचीः चोरमळे

| रसायनी | वार्र्र्ताहर |

शिक्षणामध्ये परीक्षा ही विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि क्षमता दर्शवते. परीक्षा देणारा विद्यार्थी हा उमेदवार असतो. विद्यार्थ्याने किती चांगले प्रदर्शन केले हे ठरवणारी व्यक्ती परीक्षक असते. त्यामुळे स्पर्धेच्या युगात परिक्षा दिल्यास उच्च दर्जाचे अधिकारी, संशोधक निर्माण होतात. असे प्रतिपादन खालापूर गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमळे यांनी केले आहे.

रायगड जिल्हा परिषद शाळा वडवळ येथे भाषा आणि गणित विषयाची तालुका स्तरीय गुणवत्ता परिक्षा संपन्न झाल्या. वडवळ शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर थळे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, कोरोना नंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कैलास चोरमळे व तालुक्याच्या विस्तार अधिकारी शिल्पा दास यांच्या संकल्पनेतून भाषा व गणित विषयाच्या तालुका स्तरीय गुणवत्ता स्पर्धा शाळा वडवळ येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. एकूण 200 पेक्षा अधिक विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले आहेत. तालुक्यातील 70 पेक्षा अधिक शिक्षक उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी साधन व्यक्ती नरेश पाटील, मनीषा म्हात्रे, चवरकर, बैसाणे, देशमुख, पठाण, नंदकुमार घरत यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे सुधाकर थळे यांनी सांगितले.

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी वडवळ शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर थळे तसेच विजया शिंदे, राजाराम जाधव, करूणा बोंबे, हर्षा काळे यांनी विषेश सहकार्य करून योगदान दिले. स्पर्धा पंच म्हणून तालुक्यातील शिक्षकांनी मोलाची कामगिरी बजावली. विजयी स्पर्धकांना बक्षिस म्हणून चषक तसेच पदकाचे योगदान सिप्ला फाऊंडेशन व अगस्त्य फाऊंडेशन यांच्याकडून प्राप्त झाले. मुलांसाठी खाऊचे वाटप बेक बेस्ट कंपनी वडवळ यांच्या कडून करण्यात आले.

Exit mobile version