। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चेंढरे येथे नुकतीच कराटे स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चौलमधील कायरा अक्षय घरत हीने उत्कृष्ट कामगिरी करीत यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतूक करण्यात येत आहे.
कायरा घरत ही चौल शितळादेवी येथील रहिवासी आहे. साळाव येथील जिंदाल विद्यामंदिर मध्ये ती शिक्षण घेत आहे. चेंढरे ग्रामपंचायतीच्या सभागृहात रविवारी (दि.24) कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कायरा घरत हीने या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले असून उत्कृष्ट फायटर म्हणून चषक प्राप्त केले आहे. पालकांकडून मिळालेले प्रोत्साहन आणि प्रशिक्षक राहूल तावडे यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनातून कायरा घरत हीने आतापर्यंत 12 हून अधिक पदके व चषक प्राप्त केले आहेत. त्यामध्ये कांस्य, सुवर्ण रौप्य पदकांचा समावेश आहे.