पादचार्यांची अक्षरशः कोंडी
। मुरुड । वार्ताहर ।
नाताळ सुट्टी पर्यटनाचा सिझन असल्याने मुरूड जंजिरा शहरात राज्याच्या विविध भागातुन शैक्षणिक सहलींचा ओघ वाढता आहे. सहलींच्या बसेस ना मुरूड शहरातील समुद्रकिनारी मार्गावर पार्किंग मिळत नसल्याने आयत्या वेळी सा. बा. विभागाच्या रस्त्यावर एकाबाजूस उभ्या कराव्या लागल्याने मंगळवारी सायंकाळी वाहने आणि पादचार्यांची मोठी कोंडी झाल्याची दिसून आले.
मुरूड बंदर मार्गावर या कोंडीत नागरिक अडकल्याने वादाचे प्रसंग घडले.या कोंडीच्या प्रकारावर नगरपरिषद किंवा प्रशासनाकडून कोणतेच नियंत्रण नसल्याने गाड्या कुठे लावायच्या असा प्रश्न चालकांना पडला आहे. समुद्रकिनारी ज्या ठिकाणी तात्पुरते वाळूवर थोडे फार पार्किंग होते त्या ठिकाणी वाळूवर पाळणे सारखी करमणुकीची बाहेरगावहून आलेली साधने फिट करण्यात आल्याने आयत्या वेळी कोंडीत आधिक वाढ झाली आहे. शनिवार रविवार म्हणजे थर्टीफर्स्ट पर्यंत आधिक गंभीर होऊन परिस्थिती हाता बाहेर जाणार असे स्पष्ट दिसत आहे. प्रचंड संखेने पर्यटक येण्याचे संकेत ठिकठिकाणहुन मिळत असून आताच पार्किंग ची समस्या उग्र होताना दिसत असून नागरिक आणि पर्यटकांना भयंकर त्रास होत आहे.सध्या मुरूड मध्ये कुठेच वाहनांना पार्किंग उवलब्ध नाही. आणि विशेष बाब म्हणून प्रशासनाने थर्टीफर्स्ट साठी देखील कोणतीही इतरत्र कुठेही पार्किंग ची व्यवस्था केली नसल्याने वाहनांची कोंडीच कोंडी होऊन या रस्त्यावर चालणे अत्यन्त अवघड होणार अशा अनेक प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.
यंदा मुरूडचा पर्यटन महोत्सव साजरा होणार नसला तरी थर्टीफर्स्ट साठी मुरूड मध्ये पर्यटकांचा महापूर निश्चित येणार अशी माहिती ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.मुरूड मध्ये प्रवेश करताना वाहनांचा टोल भरावा लागतो.,परन्तु येथे पेड पार्किंग देखी ल नसल्याने अनेक पर्यटकांनी प्रशासनावर चांगलेच तोंड सुख घेतले. मुरूड ला पर्यटनाचा मबीफ दर्जा असूनही पायाभूत सुविधा शासनाने अद्याप दिल्या नसल्याने याला विकास म्हणणे कितपत योग्य आहे असा सवाल अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.