| अलिबाग | प्रतिनिधी |
केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ़ (ओडिशा) करिता 13+1 (यामध्ये वेंकटगिरीकरिता 2 जागांचा समावेश आहे) च्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर /सोलापूर/ मुंबई/ औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि.10 जुलै 2022 पर्यंत मागविण्यात आलेले होते. त्यास दि.11 जुलै 2022 पर्यंत केंद्र शासनाच्या सुधारित कार्यक्रमानुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे परिपूर्ण अर्ज दि.11 जुलै 2022 पर्यंत संबंधित प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग कार्यालय यांच्याकडे सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या लिंकवर तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.