ई- नॉमिनेशनची पीएफसाठी मुदतवाढ

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पीएफ खातेधारकांना ई- नॉमिनेशन करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 31 डिसेंबर ही मुदत दिली होती. मात्र या तारखेनंतरही ई-नॉमिनेशन करता येईल, असे ईपीएफओ कडून स्पष्ट करण्यात आले आहे. ई- नॉमिनेशनद्वारे खातेधारकांना आपल्या खात्याशी नॉमिनी जोडता येऊ शकतो. 31 डिसेंबरनंतरही ई- नॉमिनेशन करता येणार असले तरी ही प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहील, हे मात्र ईपीएफओकडून सांगण्यात आलेले नाही. ईपीएफओच्या ऑनलाइन पोर्टलवर डाउनलोड होण्यासह अनेक समस्या उद्भवल्याच्या तक्रारी खातेदारांनी केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर ई- नॉमिनेशनला मुदतवाढ देण्यात आली आहे.

Exit mobile version