एकविरा यात्रेसाठी एसटीच्या जादा गाडया

| पेण | प्रतिनिधी |
आई एकविरा कार्ला येथील यात्रेला येत्या 28 मार्च रोजी प्रारंभ होत असून या यात्रेसाठी जाणार्‍या आगरी कोळी बांधवांसह इतर भाविकांच्या सुखकर प्रवासासाठी रायगड एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. रायगडमधील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने विविध आगारातून जादा गाडया सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

28 मार्च रोजी यात्रेचा मुख्य दिवस जरी असला तरी अनेक भाविक हे यात्रेच्या एक दोन दिवस अगोदरच कार्ला येथे यात्रेसाठी रवाना होत असतात. त्यामुळे एसटी महामंडळाने यात्रेच्या आदल्या दिवशीच म्हणजेच 27 मार्च रोजी आणि यात्रेच्या दोन दिवसानंतर म्हणजेच 30 मार्चपर्यत जादा गाडया सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि धोका पत्करून खाजगी वाहनांचा वापर करू नये यासाठी एसटी महामंडळाने आपल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गाडया सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगड परिवहन विभागातील अलिबाग, पेण, कर्जत, रोहा आणि मुरूड या पाच आगारातून या जादा गाडया सोडण्यात येणार असुन अलिबाग-कार्ला, पेण-कार्ला, मुरूड-कार्ला, रोहा-कार्ला, पनवेल-कार्ला या मार्गावर देखील प्रवसी गर्दीचा अंदाज घेउन गाडया सोडल्या जाणार आहेत. त्याच प्रमाणे यात्रेच्या ठिकाणी काही गाडया वस्तीच्या प्रकारे तिथेच वास्तव्याला ठेउन जशी प्रवाशांची गर्दी असेल त्याप्रमाणे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती रायगड नियंत्रक विभाग प्रमुख दिपक घोडे यांनी दिली

Exit mobile version