| हमरापूर । वार्ताहर ।
प्रवाशांनी आरक्षण निश्चित करून घ्यावे असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अष्टविनायकांपैकी असणार्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येथे प्रचंड गर्दी होऊन त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर यात्रा सुद्धा भरत असल्याने, 25 जानेवारी रोजी माघी गणेशोत्सव असून दुसर्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त देखील सुट्टी आहे. त्यामुळे या दोन दिवस भक्तांची तसेच पर्यटनाची वाढती गर्दी पाहता एसटी महामंडळाने भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी जास्तीच्या दहा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे भक्तांमध्ये आनंद होत आहे.
एसटीच्या आरक्षित दहा गाड्यांव्यतिरीक्त पेण डेपोच्या चार, रोहा येथील दोन, अलिबाग दोन, आणि कर्जत दोन अशाही आणखी दहा बसेस पाली येथे प्रवाशांना जाण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे राखून ठेवल्या जादा गाड्यांचा प्रवाशांनी पुरेपूर फायदा करावा आणि आपले आरक्षण लवकरात निश्चित करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या आरक्षणासाठी प्रवाशांनी msrtc mobile app आणि msrtc.gov.com या ठिकाणी जाऊन ऑनलाईन आरक्षण निश्चित करावे, असे महामंडळाकडून सूचित करण्यात आले आहे.
महामंडळाच्या जादा गाड्या
24 जानेवारी ठाणे ते पाली (17: 00 वाजता), मुंबई ते पाली (17:00 वाजता), बोरिवली ते पाली (17:00वाजता)
25 जानेवारी ठाणे ते पाली ( 5:30 वाजता), मुंबई ते पाली (6:00 वाजता), बोरिवली ते पाली (6:00 वाजता)
26 जानेवारी पाली ते ठाणे (15: 00 वाजता), पाली ते ठाणे (16: 00 वाजता), पाली ते मुंबई (17:00 वाजता), पाली ते बोरिवली (18:00 वाजता)
सुखकर आणि आरामदायी प्रवासासाठी गेली अनेक वर्ष प्रवाशी वर्गाने एसटी ला पसंती दिली असून, प्रवाशांच्या सेवेसाठी तात्काळ हजर असणारी एसटी महामंडळाने येत्या 25 जानेवारी रोजी माघी गणेशोत्सव होत असल्याने सदरच्या गाड्यांचे प्रवाशांनी आरक्षित करून घेऊन प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
दिपक घोडे
विभाग नियंत्रक रायगड