समुद्रातील प्राण्यांचा,माशांचा मृत्यू
| नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गेल्या 15 दिवसांत अमेरिका आणि कॅनडा भागात भीषण तापमान वाढले आहे. त्यामुळे प्रशांत महासागर आणि आजूबाजुच्या समुद्रातील कोट्यवधी प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे जीव इतके तापमान सहन करू न शकल्याने त्यांचा अंत झाला आहे. या भागात उच्च तापमानामुळी रस्त्यांवर भेगा पडल्या आहेत. अनेक घरातील भिंती अक्षरशः वितळल्या आहेत.
न्युयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या दोन आठवड्यांत कॅनडा आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात तामपान वाढले आहे. त्यामुळे या भागातील समुद्रात 100 कोटींहून अधिक समुद्रातील प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. समुद्रात शिंपले आतल्याआत उकडले गेले आहेत. अनेक दगडांवर तारा मासा मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आढळले आहेत. तर नदीतल्या सालमन माशांना वाढत्या तापमानामुळे पोहण्यास त्रास होत आहे.काही सरकारी संस्थानी या प्राणी आणि माशांना उचलून थंड पाण्यात टाकले आहेत. त्यात इडाहो यासारख्या माशांचाही समावेश आहे. परंतु सर्व माशांचा वाचवण्यात यश येत नाहिये. अनेक माशांना थंड पाण्यात टाकण्यापूर्वी त्यांचा मृत्यू होत आहे. अनेक माशांनी दिलेली अंडीही या तापमानामुळे नष्ट झाली आहेत. मृतांपैकी एकूण प्राणी आणि माशांचे प्रमाण हे 90 टक्के इतके आहे असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यांना वाचवण्यासाठी अनोखे उपाय केले पाहिजे अन्यथा अनेक मासे आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होतील अशी भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.