। कोलाड । वार्ताहर ।
आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल, शंकरराव म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान व गांव ग्रामपंचायत ता. रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. हरिभाऊ लक्ष्मण म्हसकर यांच्या स्मरणार्थ पुगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन शनिवार, दि. 10 डिसेंबर रोजी वेळ सकाळी 10 ते 2 वा.पर्यंत करण्यात आले आहे.
मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणार्या रुग्णांनी येताना सोबत आधारकार्ड व रेशनकार्डची छायांकित प्रत घेऊन यावी, मधुमेहाची व रक्तदाबाची औषधे सुरू असल्यास तीदेखील घेऊन यावी. पेशंटला ऑपरेशनसाठी जाण्या-येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली जाईल. मोतिबिंदू झालेल्या रुग्णांना त्वरित पनवेल येथे शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येईल.
तरी रुग्णांनी येताना तशी तयारी करुन येणे. अधिक माहितीसाठी गणेश म्हसकर 9420058965, श्यामभाऊ लोखंडे 8888787549, बबन म्हसकर 9209505459, मनोहर महाबळे 8806123545, नंदकुमार कळमकर 7719801974, शिवराम महाबळे 8446590930, गोरखनाथ देवकर 8390441155, चंद्रकांत धामणसे 9271559046, शरद कचरे 9637212157, ज्ञानेश्वर भोईर 9823047911, राम कळमकर 8169222645 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.