लायन्स क्लबच्यावतीने नेत्र तपासणी

| नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे लायन्स क्लबच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या शिव गणेश सभागृहात मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर गुरुवार (दि.13) रोजी संपन्न झाले. यावेळी विभागातील सुमारे 218 नागरिकांनी या शिबिरात सहभागी होत उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रकाश जैन, यशवंत चित्रे, अनिल गिते, विवेक सुभेकर, संतोष शहासने, सुजाता जवके, दौलत मोदी, दिपक गायकवाड, विवेक करडे, श्‍वेता सुभेकर, विशाल शिंदे, सुशिल राजिवले, दिपीका गायकवाड, शंकरा आय केअर सेंटरचे प्रकाश पाटील व त्यांची टीम आदी उपस्थित होती.

Exit mobile version