दी लाईफ फाऊंडेशनतर्फे नेत्र तपासणी

| सोगांव | वार्ताहर |

दी लाईफ फाऊंडेशन आणि शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल, यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन 8 सप्टेंबर रोजी विठ्ठल रखुमाई मंदीर हॉल, छत्रपती शिवाजी महाराज चौक अलिबाग येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प अलिबागचे बाल विकास प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, भाग्यश्री पाटील व कल्पिता सारावकर हे सेविकांसह उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दी लाईफ फाऊंडेशनचे कार्यकर्ते शिलानंद इंगळे, राखी राणे, प्रणय ओव्हाळ यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version