फजंदार हायस्कूल वहूरचे मैदानी स्पर्धेत यश

| महाड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा पावसाळी मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये फजंदार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वहूर-महाड या शाळेने जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात कुमार तसव्वूर घोले याने गोळाफेक प्रकारात प्रथम क्रमांक आणि थाळीफेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. 17 वर्षे वयोगट मुली हातोडा फेक कुमारी जायरा रेहमान हिने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन्ही खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली असून 21 व 22 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे या स्पर्धा होणार आहेत. तसेच शाळेचे विद्यार्थी कुमार सुवेद मांदरे 400 मीटर धावणे चतुर्थ क्रमांक, कुमार पटेल अजलान 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन अब्दुल रऊफ फजंदार व सचिव पटेल तसेच संस्थेचे पदाधिकारी नदीम फजंदार सर शाळेचे मुख्याध्यापक राहील सर तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक रमेश खोत सर व विजेते विद्यार्थी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्व क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version