| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुका पोलीस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवत गेली पाच ते सहा महिने तालुक्यातील गावांमध्ये वाहन चालक व व्यावसायिकांकडून पैसे वसूल करीत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, हा बहाद्दर पोलिसांनादेखील रंगेहाथ सापडत नव्हता. अखेर शुक्रवार, दि. 14 जुलै रोजी त्याला महाड तालुका पोलिसांनी तालुक्यातील रेवतळे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पोलीस वर्दीमध्ये विद्यार्थ्यांना व्याख्यान देताना रंगेहाथ पकडले आहे. त्याचे नाव अनिकेत प्रदिप मेस्त्री असून, तो पोलादपूर आनंद नगर येथील रहिवासी आहे. यापुढील संपूर्ण तपास महाड तालुका पोलीस ठाणे करीत आहेत.