माथेरानमधील घटना
| माथेरान | वार्ताहर |
अरबी शिक्षण घेण्यासाठी पालकांकडून होत असलेल्या सक्तीमुळे मुलाने स्वतःच्या अपहरणाचा किस्सा घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे. अरबी शिक्षणासाठी जात असलेल्या मुलाला अपहरण करण्याचा प्रयत्न झाला असे माथेरान मध्ये सर्वत्र पसरले होते सदर घटनेतील मुलाने आपल्या आई-वडिलांना आपले अपहरण करण्यासाठी दोन मास्कधारी इसमांनी प्रयत्न केला, अशी माहिती दिली होती. त्यामुळे सदर मुलाच्या वडिलांनी थेट पोलिसांशी संपर्क साधून घटनेची प्राथमिक माहिती दिली होती. ताबडतोब सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले.त्यात एक धक्कादायक माहिती समोर आली होती हा मुलगा ज्या वेळेमध्ये सदर घटना घडली हे सांगत होता त्यावेळेस त्या भागामध्ये फिरकलाच नाही. तेव्हा मात्र पोलिसांना वेगळा संशय आल्याने त्यांनी घरातील पालकांशी चर्चा केली तेव्हा मुलाला अरबी शिक्षण घेण्यासाठी जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले. आपणास शिक्षण घेण्यास पालकांनी सक्ती करू नये म्हणून मुलानेच हा सर्व बनाव रचल्याचे समोर आले आहे.