प्रसिद्ध अभिनेता शिव कुमार सुब्रह्मण्यम यांचे निधन

। मुंबई । वृत्तसंस्था ।
सोमवारी (11 एप्रिल) बॉलिवूडवर आणखी एकदा शोककळा पसरली. प्रसिद्ध अभिनेते आणि पटकथा लेखक शिव कुमार सुब्रह्मण्यम यांचे निधन झाले. शिव कुमार यांच्या पार्थिवावर सोमवारी मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते हंसल मेहता यांनी शिव कुमार यांच्या निधनाचे वृत्त दिले. हंसल मेहता यांनी ट्वीट करून शिव कुमार यांनी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक चित्रपट आणि टीव्ही सीरिअल्समध्ये आपल्या दमदार अभिनयाने शिव कुमार यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. शिव कुमार यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Exit mobile version