प्रसिद्ध गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड

| मुंबई | प्रतिनिधी |

आपल्या आगळ्या वेगळ्या गायकीसाठी केवळ भारतच नाही तर जगभरामध्ये ज्यांची ख्याती होती अशा पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं आज (दि.२६) निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीतविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.

आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बॉलीवूडमध्ये गेल्या चार दशकांहून अधिक काळ पंकजींनी आपल्या गायकीनं वेगळी ओळख तयार केली होती. दीर्घ आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. ८० च्या दशकांत पंकजींनी त्यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तब्बल चार दशकांहून अधिक काळ ते संगीत विश्वात सक्रिय होते.

Exit mobile version