विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

। सुतारवाडी । वार्ताहर ।

केंद्र शाळा कुडली येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू म्हणून राधा कृष्णाची प्रतिमा देऊन सर्व शिक्षकांचे स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापिका म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आम्हाला तुमची खूप आठवण येईल, तुम्ही पुढे शिकून मोठे झाले तर आम्हाला खूप आनंद होईल. अशा भावना व्यक्त केल्या व निरोप समारंभाची सांगता केली. या समारंभानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला म्हात्रे, सुचिता रामधरणे, मोहन राठोड इत्यादी उपस्थित होते.

Exit mobile version