संदीप पोमण यांना निरोप

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण यांची स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा, अलिबाग येथे बदली झाल्याने रविवारी (दि.28) नागोठणे पोलिस ठाण्यात आयोजित संदीप पोमण यांच्य निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास पो.उपनिरिक्षक संजय चव्हाण, सहा.पो.उपनिरिक्षक प्रमोद कदम, विनोद पाटील, जिल्हा शांतता समितीचे सदस्य अशपाक पानसरे, सामाजिक कार्यकर्ते संजय महाडिक, किशोर म्हात्रे, नाजिम नालखांडे, आसिफ मुल्ला, अखलाक पानसरे, ज्ञानेश्‍वर साळुंखे, एकनाथ ठाकूर, साईनाथ धुळे, प्रभू तांडेल, प्रथमेश काळे, सचिन मोदी, पुंडलिक ताडकर, प्रवीण ताडकर, बिलाल कुरेशी, सिराज पानसरे, अकबर पठाण, आसिफ मुल्ला, अकबर पठाण, महिला दक्षता समितीच्या सुजाता जवके, राजश्री टके, निलोफर पानसरे, अपर्णा सुटे, संगीता पोलसानी, चेतन कामथे, अल्विन नाकते, निलेश भोपी, प्रणव रावकर, खुर्शिद अधिकारी, जाफर कुरेशी, मुजावर कडवेकर, तात्या पोत्रिक आदींसह अनेक मान्यवर, विभागातील पोलिस पाटील व नागरिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले.

Exit mobile version