पौष्टीक तृणधान्य दिनानिमित्त शेतकरी मेळावा

| नेरळ | प्रतिनिधी |
सन 2013 पौष्टिक तृणधान्य वर्षे म्हणून केले आहे. पावसात ज्वारी, बाजरी, नाचणी वरई या तृणधान्य पिकांचे क्षेत्र वाढवण्याबरोबरच या पिकाचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन स्वास्थ्यविषयक आहारात समावेश केला आहे. त्याची जनजागृती कृषी विभाग करीत असून, कर्जत तालुक्यातील शेलू येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेलू गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित केलेल्या कर्याक्रमात शेलू ग्रामपंच्यातीचे सरपंच खारीक, भाऊ भोईर, ग्रामपंचायत सदस्यता बूधी दरवडा, चित्रा कोंडिलकर, ग्राम बचत गट समन्वयक रेखा हिरेमठ यांच्यासह अक्षय हिसलगे, माजी उपसरपंच महेश शेकटे, दुर्वास सोनावले आदी उपस्थित होते.

यावेळी कृषी पर्यवेक्षक मंगेश गलांडे यांनी पौष्टिक आहाराचे महत्त्व सांगत तृणधान्य यांच्यापासून तयार झालेला पौस्टिक आहार सर्वांनी ही आजच्या काळाची गरज आहे स्पष्ट केले. तर कृषी पर्यवेक्षक सचिन केने यांनी कोव्हिडनंतर सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे आपण आपली पारंपरिक पीक कमी करून भात आणि गहू यांवर जास्त सर्वाधिक अवलंबून राहतो असे स्पष्ट करीत आपली रोगकारक शक्ती वाढविण्यासाठी सर्वांनी पौष्टिक प्रधान्य, ज्वारी, बाजरी, नाचणी, वर पिकांचा अन्नात वापर वाढवावा असे केले.

Exit mobile version