। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील खांब ते पालदाड मार्गावरील धानकान्हे-चिल्हे गावाजवळील शेतात वणवा लागल्याची घटना घडली आहे. भर दुपारच्या सुमारास अज्ञाताने लावलेल्या आगीचे रूपांतर वणव्यात झाल्याने सर्वत्र एकच हाहाकार उडाला होता. भर दुपारच्या सुमारास धानकान्हे-चिल्हे गावाच्या हद्दीतील शेती क्षेत्रात कोणी अज्ञाताने वणवा लावून दिला होता. प्रखर ऊन आणि वार्याच्या झोताबरोबर बघता बघता वणव्याची व्याप्ती पसरू लागली. याची झळ बागायती शेती व कडधान्ये पिकाला लागल्याने पिकेही होरपळून गेली. तर, शेतकरी वर्गाने गुरांसाठी साठवलेला चाराही जळून खाक झाल्याने शेतकरी वर्गाला फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.