शेतकऱ्यांना जमीन मोबदल्याची प्रतीक्षा

वीस वर्षापासून सा.बां. विभागाची टाळाटाळ; शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात!

| महाड | प्रतिनिधी |

सन 2005 च्या. नैसर्गिक आपत्तीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गा वरील कशेडी घाट पूर्णपणे बंद झाल्याने कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून नातू नगर तुळशी खिंड विन्हेरे महाड असा पर्यायी मार्ग करण्यात आला. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीदेखील संपादित झाल्या मात्र तब्बल वीस वर्षानंतर देखील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टाळाटाळ होत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

विन्हेरे तुळशी खिंड नातू नगर मधील रस्त्याच्या कामासाठी फाळकेवाडी ताम्हणे व विन्हेरे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी 2005 च्या नैसर्गिक आपत्ती कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून विन्हेरे, ताम्हणे, फाळकेवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून सन 2005 च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्वीचा व आत्ताचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खचल्यामुळे या महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून हा रस्ता करण्यात आला. त्यासाठी या गावातील किमान 135 शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ताब्यात घेऊन त्यावरती रस्ता तयार केला.

महाड -विन्हेरे -तुळशीखंड- नातू नगर या मार्गाकरता विन्हेरे, ताम्हणे, फाळकेवाडी या गावातील 135 शेतकऱ्यांच्या जमिनी ग्रामीण मार्गानुसार शासन निर्णय होऊन या रस्त्याच्या संपादित शेत जमिनीसाठी शेतकऱ्यांच्या भूसंपादित जमिनीसाठी त्यावेळी 2700 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, आजपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीची संयुक्त मोजणी झालेली नाही.

महाड विन्हेरे तुळशी खिंड नातू नगर या रस्त्याच्या कामासाठी विन्हेरे, ताम्हणे, फाळकेवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 2005 पासून आज 20 वर्षाचा कालावधी लोटला. ना शेतकऱ्यांना वीस वर्षापासून संपादित केलेल्या जमिनीचे भुईभाडे ना त्यावरील नष्ट केलेल्या आंबा, काजू, जांभूळ यासारख्या झाडांचा मोबदला व शेतकऱ्यांचे जनावरांचे गोठे व घर याचा देखील मोबदला मिळालेला नाही. केवळ शेतकऱ्यांना दरवर्षी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभाग महाड हे आश्वासनाचे गाजर देण्याचे काम करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

महाड-विन्हेरे-तुळशी खिंड-नातू नगर या रस्त्याच्या कामासाठी संपादित झालेल्या विन्हेरे, ताम्हणे, फाळकेवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. त्यांना बाजार भावाप्रमाणे भाव देणे अपेक्षित असताना केवळ सोपस्कार पार पाडायचे म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने संपादित जमिनीसाठी मनमानी पद्धतीने प्रस्ताव शासनाकडे सादर केला. आज झालेल्या महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये येथील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र नापसंती व्यक्त करून तातडीने आमच्या जमिनीचे संयुक्त मोजणी व बाजारभावाप्रमाणे जमिनीच्या मोबदला देण्याची मागणी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी सभापती सिताराम कदम विन्हेरे गावचे उपसरपंच चंद्रकांत मोरे, जितेंद्र माने यांच्यासह तिन्ही गावातील शेतकरी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्याकडे वारंवार विनंती करीत असताना केवळ या बजेटमध्ये काम होईल. पुढच्या बजेटमध्ये काम होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. आम्ही सर्व शेतकरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूलथापांना आता थकलो असून, आम्हाला बाजारभावाप्रमाणे न्याय मिळत नसेल तर आम्ही शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत. येत्या आठ दिवसात आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदल्याची सुरुवात बाजारभावाप्रमाणे तसेच संपादित केलेल्या जमिनीचे भुईभाडे व त्यावर असणाऱ्या वृक्षसंपदेची नोंद करून त्याचे देखील मूल्य आम्हाला या संपादित जमीन क्षेत्रांमध्ये समाविष्ट करावे. तसे न केल्यास महाड विन्हेरे तुळशी खिंड मार्ग जाणारा राज्य मार्ग आम्ही बंद करणार, असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांना दिला आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्याच्या कामासाठी संपादित झाल्या आहेत त्या जमिनी बहुमूल्य किमतीच्या असल्याने शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे भाव मिळणे अपेक्षित आहे मात्र दरवर्षी शेतकऱ्यांची फसवणूक करीत आज वीस वर्षाचा कालावधी उलटून गेला मात्र शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी केले आहे.
Exit mobile version