शेतकरी कामगार पक्ष चषक 2024

दादरेश्‍वर जांभूळपाडा संघ प्रथम विजेता


| सोगाव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील मूनवली येथे शेतकरी कामगार पक्ष चषक 2024 आयोजित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. 10 ते 12 फेब्रुवारी रोजी मूनवली येथील क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वसीम कुर, ग्रामपंचायत सदस्य विजय भगत यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील नामांकित 24 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना दादरेश्‍वर जांभूळपाडा संघ विरुद्ध गावदेवी झिराड संघ यांच्यात अटीतटीच्या लढतीत दादरेश्‍वर जांभूळपाडा संघ विजयी झाला. त्याना प्रथम क्रमांकाचे 50,000 रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तर गावदेवी झिराड संघाने द्वितीय क्रमांक 25,000 जय हनुमान मूनवली संघाने तृतीय क्रमांकाचे 15,000 हजार रुपये पुरस्कार व चषक पटकावला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून साई झिराड संघाचा साहिल, तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून दादरेश्‍वर जांभूळपाडा संघाचा शुभम धसाडे, तसेच मालिकावीर म्हणून जय हनुमान मूनवली संघाचा आदित्य भगत यांना गौरविण्यात आले.

सर्व विजेत्या संघांना व उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वसीम कुर, मापगाव ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, मुशेत येथील सामाजिक कार्यकर्ते जगदीश सावंत, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य मजीद कुर, जगन्नाथ पाटील, मुद्स्सर कुर, इलियास हाफिज, जगदीश बारे, संदेश पाटील, गोविंद अनमाने, सुनिल अनमाने, दिलिप मोंढे, संजय सोनावणे, प्रकाश गुळेकर, मनिष म्हात्रे, गितेश करळकर, किफायत कुर, राजेश परब,संतोष भगत, अनंत सकरे, प्रभाकर मोहिते यांच्याहस्ते तसेच पुष्पा कदम, प्रेरणा गुळेकर, अनिता सोनावणे, ज्योत्स्ना भगत, आदिती हरवडे, शुभांगी भगत, स्वाती भगत, विशाखा पवार, रेश्मा भगत, पूजा भगत, साक्षी कदम, मिनल कदम, आयुष गुळेकर, श्रावणी भगत, जिज्ञासा जाधव व इतर मूनवली महिला मंडळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार व चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मूनवली, सोगाव पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जय हनुमान मंडळ मूनवली संघाच्या सर्व खेळाडूंनी व मूनवली ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेत सूत्रसंचालन अजित हरवडे यांनी केले. तर समालोचन संजय म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version