। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील उमटे येथे बोरघर ग्रामपंचायत सदस्य उत्तम रसाळ आयोजित स्व. चंद्रकांत दादा रसाळ शेतकरी कामगार पक्ष चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा एसटी भोनंग संघ मानकरी ठरला.
उमटे येथील श्री करांजाई येथील ग्राऊंडवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि.18, 19 आणि 20 फेब्रुवारीला भरविण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक एसटी भोनंग संघास रोख रक्कम 30 हजार व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक नवतरूण खानाव संघास 20 हजार रूपये व चषक, तृतीय क्रमांक यज्ञेश रामराज संघास 10 हजार रूपये व चषक तर चतुर्थ क्रमांक दादा इलेव्हन उमटे संघास 10 हजार रूपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.