चंदू काका सराफ आयोजित फॅशन शो दिमाखात

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलमध्ये संपन्न झालेल्या चंदू काका सराफतर्फे आयोजित फॅशन शो 2025 मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री कोमल शेटे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते त्यांच्या विवाह तस्मै या सेगमेंटचे आणि संपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी चंदू काका सराफ पनवेल शाखेचे व्यवस्थापक अमेय जोशी, सहव्यवस्थापक योगिता चोगले, कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणारे मंदार काणे एंटरटेनमेंटचे मंदार प्रमोद काणे, कोरिओग्राफर शुभांगी खैरे, तसेच उपस्थित मान्यवर आणि रसिकप्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, अभिनेत्री कोमल शेटे यांना शाल, नारळ आणि सुंदर असे चंदू काका सराफ यांच्यातर्फे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले.

फॅशन शोच्या परीक्षक स्वाती सोनावणे, कोरिओग्राफर शुभांगी खैरे यांना ट्रॉफी आणि चंदू काका सराफ यांच्यातर्फे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून इंस्टाग्राम क्रिएटर प्रणया साळवी, सौरभ भोईर, लागू बंधू 2025 ची विजेती अक्षता शिर्के या सर्वांना ट्रॉफी आणि चंदू काका सराफ यांच्यातर्फे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये मिसेस 2025 च्या विजेत्या प्रज्ञा इंगळे, मिसेस 2025 च्या विजेत्या मयुरी हुडेर या दोघीनांही खूप सुंदर असा क्राऊन, साश, ट्रॉफी आणि चंदू काका सराफ यांच्यातर्फे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version