चुकीच्या वासरनोंदीच्या निषेधार्थ आमरण उपोषण

| उरण | वार्ताहर |
कोंकण विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी आणि तहसीलदार उरण यांनी सदर नोंद चुकीच्या पद्धतीने झाल्याने सदर फेरफार रद्द करण्यात यावा, असा स्पष्ट अहवाल दिलेला असूनही उपविभागीय अधिकारी पनवेल आणि यांनी आदिवासी महिलेवर अन्यायकारक निर्णय दिलेला आहे. त्या निषेधार्थ प्रजासत्ताकदिनी प्रांत अधिकारी कार्यालय पनवेल येथे मुक्ता कातकरी ही आमरण उपोषणाला बसली आहे. अनेक संघटना हे उपोषण स्थळी येऊन सदर उपोषणास पाठिंबा देत आहेत.

दिघोडे तालुका उरण येथील सर्व्हे नंबर 94/8 आणि 100/1 ही पाच एकर जमिनीच्या सात बारा सदरी लहाण्या कातकरी ह्या आदिवासी व्यक्तीची नोंद होती. त्याच्या मृत्यूनंतर महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांनी घरत कुटुंबियांशी संगनमत करून चुकीच्या पद्धतीने वारस म्हणून घरत कुटुंबियांची नावे सात बारा सदारी दाखल केली. कातकरी आडनाव असलेल्या आदिवासी व्यक्तीचे वारस म्हणून आगरी समाजातील घरत आडनाव असलेल्या व्यक्तीची वारस म्हणून कशी नोंद होवू शकते, मूळ मुद्दा आहे. त्या निषेधार्थ मुक्ता कातकरी ही आमरण उपोषणाला बसली आहे.

Exit mobile version