ऑटो, कंटेनरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

। वर्धा । प्रतिनिधी ।

वर्धा शहरात ऑटो आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला असून यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

वर्ध्याच्या पूलगाव नजीकच्या केळापूर येथे ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. अपघातातील ऑटो हा वर्ध्यावरून पूलगावच्या दिशेने जात होता. दरम्यान, समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने ऑटोला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत ऑटोमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना सावंगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version