| पालघर | प्रतिनिधी |
अहमदाबाद महामार्गावर हालोली गावाच्या हद्दीतील भिवंडीकर ढाब्यासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सुभाष वड (25) आणि स्वप्नील परब (20) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत. मंगळवारी (दि.11) रात्री एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीला अज्ञात कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला होता. या प्रकारणी अज्ञात कंटेनर चालका विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातातील मृत आणि गंभीर जखमी असलेले चौघेजण मंगळवारी रात्री एकाच दुचाकीवरुन ढेकाळे येथून मुंबई अहमदाबाद महामार्गावरुन बोईसर पूर्वेकडील मान येथे जात होते. रात्री पावणेएक वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी हालोली गावच्या हद्दीतील भिवंडीकर ढाब्यासमोर पोहोचली. त्यावेळी दुचाकीला कंटेनरच्या किनार बाजूची धडक लागल्याने दुचाकी महामार्गा पडली. या अपघातात दुचाकीस्वार सुभाष वड, रा. वडपाडा ढेकाळे आणि स्वप्नील परब, रा. मान, ता. पालघर यांचा कंटेनरच्या टायर खाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला तर भावेश गणेश दांडूळे (28) राज सत्रु मिश्रा (19) दोघेही रा.मान ता. पालघर गंभीर जखमी झाले आहेत.